बिहारी नवरा-बायको पाणीपुरी खायला जातात…

नमस्कार मंडळी…!!

हसणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हसून राहणारा माणूस काही काळ आपला तणाव विसरतो आणि जीवनात खूप आनंदित आणि फ्रेश राहतो. मला सांगा हसणे कोणाला आवडत नाही, परंतु आजकाल धकाधकीच्या आयुष्यात माणूस स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही आणि बहुतेक वेळा जीवनाच्या शर्यतीत उदास राहतो. अशा परिस्थितीत जर आपण एखाद्याला विनोद सांगतो त्यांनतर तो माणूस हसतो आणि आपलया सर्व तणावापासून मुक्त होतो आणि त्याचे मन आनंदित होते. म्हणून लोकांना हसवत रहा आणि आनंदित रहा तसेच स्वतः देखील हसत रहा. आज हि आम्ही असेच काही विनोद तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि हे विनोद शेयर करणार….!!!

विनोद १- आजीबाई रोज बसमधील कंडक्टरला भिजवलेले काजू बदाम खायला देत असे. एकदा न राहून कंडक्टरने आज्जींना विचारलेच-
आज्जी, तुम्ही मला रोज काजू बदाम का खायला देता? आजीबाई – बाळा दात तर राहिले नाहीत………. आणि
नुसत चघळून फेकून देणे बरे नाही वाटत……कंडक्टर वकुन वकुन मे ला………..

विनोद २- सासऱ्याचा चहा पिऊन झाल्यावर सून चहा चा कप न्यायला येते. कप उचलायला वाकणार तेवढ्यात जोरात पा दते आणि
बिचारी लाजून कप न उचलताच किचन मधे पळून जाते. हे पाहून सासरा सुनेला परत बोलवतो आणि विचारतो
सुनबाई, तुझं इथे काही काम होत कि फक्त पादा यलाच आली होतीस …

विनोद ३- एका गांवात एक ज्योतीषी आलेला असतो… त्याच्याकडे एक महिला जाते…
तो ज्योतीषी म्हणतो उद्या येताना तुझ्या नव-याची कुंडली घेऊन ये.. ती घेऊन जाते… ती पाहून तो सांगतो, तुझ्या नव-याचे नांव तुकाराम आहे..
ती म्हणते व्हय महा राज !! तो पुढे सांगतो , तुझ्या सास-याचे नांव गेणू होतं ती म्हणते व्हय महा राज.. तो पुढं सांगतो .. तुला दोन मुलं आहेत .. मुलगा थोरला त्याचे नाव सर्जा अन्
धाकटी मुलगी तीचे नाव गंगी आहे….आश्चर्याने ती पुन्हा म्हणते व्हय महाराज.. तो पुढे सांगतो… तुम्ही कालच घरी गहूं आणि तांदुळ आणलेत… मग तर ती चकित होऊन त्याच्या पायांवर लोटांगणच घालते
म्हणते, महाराज आपण तर अंतर्यामी आहात… त्यावर तो तिला म्हणतो, हे रेशन कार्ड घेऊन जा आणि उद्या येताना कुंडली घेऊन ये….. हसामोठ्याने.

विनोद ४- एक दा रु ड्या मे ल्यानंतर स्व र्गात पोहचला. त्याला पूर्ण स्व र्ग दाखवला गेला. बिचा-याचा विश्वासच बसत नव्हता.
म्हणून त्याने यमरा जाला विचारलं की मी तर इतका दा रु ड्या माणूस. तरीही स्वर्गात कसा काय आलो? यमराज म्हणाले …….
अरे बाबा, तू जे दारू पिताना चकना म्हणून शेंगदाणे खाऊन झोपी जायचा . . . . ते सगळे दिवस उपवासात काउंट झाले.

विनोद ५- एका आजोबांच्या डोक्यावर फक्त ८ केस आजोबा केस कापायला सलून मध्ये गेले….
आजोबा सलुन मध्ये जाऊन खुर्चीत बसले आणि लगेच तेथील दुकानदाराने आजोबाला विचारले: आजोबा केस मोजु की कापु?
आजोबा म्हणाले : कलर कर …कलर……….

विनोद ६- मुलगी फोनवर बोलत लिफ्टमध्ये आली .. आणि मंग्या कडे पाहुन हसली …..
लगेच फोनवर बोलली . ” चल ग फोन ठेवते , एक Handsome आणि dashing मुलगा लिफ्टमध्ये आलाय . बघते काही जमते का? बाय ..
मंग्या काही बोलणार इतक्यात ती बोलली . ” Sorry kaka , मला ना फोन ठेवायचा होता म्हणुन असे बोलले .
आई शपथ्थ… एवढा अपमान कधीच झाला नव्हता…….

विनोद ७- पुण्यात एक आजी सिग्नल तोडून स्कूटीवरुन पुढे गेल्या…..
ट्रॅफिक हवा लदाराने शिट्टी वाजवून पाठलाग करत पुढच्या सिग्नलवर त्यांना अडवलेच!….
हवा लदार : मी इतक्या शिट्ट्या वाजवल्या तरी तुम्ही थांबला नाहीत??
आजी : मे ल्या….शिट्टी वाजवल्यावर थांबायचं वय आहे कां माझे??…

विनोद ८- नवरा थकून ऑफिस वरून घरी येतो आणि आपल्या बायकोच्या डोळ्यावर प्रेमाने हाथ ठेवतो…..
बायको- राजू…. नवरा एकदम संतापतो आणि जोरात ओरडतो मी राजू नाही तुझा नवरा आहे…..
बायको- (घाबरून) अहो रागवू नका मी असं म्हणत होती कि राजू पाणी घेऊन ये साहेब आले…..

विनोद ९- नवीन लग्न झालेले नवरा बायको नवीन घरात राहायला जातात. काही दिवसानंतर नवरा बायकोला “आपण हे घर बदलून टाकू?”
बायको : का? काय झालं?
नवरा : अगं तो घरमालकाचा मुलगा चौकात सांगत होता कि १ घर सोडून बाकी सर्व बायकांन बरोबर त्याची ल*फडी आहेत?
बायको : मग नक्की ती २० नंबर फ्लॅट वाली कमला असेल, खूपच Attitude आहे तिला….

विनोद १०- आपला गण्या कपड्यांचे नवीन दुकान काढतो. एक रात्री त्याला स्वप्न पडत कि एक ग्राहक २० मीटर कपडा मागतो आहे.
तोच खुश होतो आणि कपडा फाडायला सुरुवात करतो. तोच बायकोला जाग येते आणि ती ओरडते ” काय करत आहात? माझी साडी का फाडली?”
गण्या झोपेतच “काय बाई आहे, दुकानात पण पिच्छा नाही सोडत”

विनोद 11- थंडीच्या रात्री नवरा बायकोला जवळ घेतो…
नवरा- ऐक ना, बाहेर मस्त थंडीय… एकदा करू ना…
बायको- अहो आता नको ना.. मघाशीच केले ना…
नवरा- प्लिज एकदा… बायको- ठीक आहे पण….
एकच कप करते हा चहा… N o n V e g मेसेज आणि माझ्याकडून…शक्यच नाही….

विनोद 12- बिहारी नवरा-बायको पाणीपुरी खायला जातात… बायको गपागप २०-२५ पाणीपुरी खाते…
बायको- अहो अजून १० पाणीपुरी खाऊ का…? नवरा- नागीण खा ले…
बायको ने संतापात प्लेट फेकली आणि जोरात ओरडली….
बायको- अरे मेल्या नागीण कोणाला बोलला रे…. नवरा- अरे मैने कहा…. ना… गिन खा ले… नवरा रॉक बायको शॉक…

मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एक व्यक्ती आयुष्यात सर्वात जास्त वेळा काय ऐकतो?????